पुणे – कॅन्टोन्मेंट भागातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, गेल्या सात दिवसांत या भागात सुमारे 50 नवीन बाधित आढळले आहेत. नव्याने समोर येणाऱ्या बाधितांममध्ये करोनाची लक्षणे स्पष्टपणे जाणवत आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे हे रुग्ण कंटेन्मेंट भागातूनच येत आहेत.
कॅन्टोन्मेंट परिसरातील परिस्थितीवर बोर्डाचे बारीक लक्ष असून, सध्या आम्ही बाधितांच्या उपचारांवर भर देत आहोत, अशी माहिती पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी दिली.
लष्कर परिसरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात करोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून ऍक्टिव्ह बाधितांच्या संख्येने शंभरी गाठली. त्यामुळे बोर्डाची चिंता वाढली आहे.