सातारा -आरोग्य विभागाकडून काल (दि. 12) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार जिल्ह्यातील पूर्वीच्या करोनाबाधितांच्या निकट सहवासातील 52, “सारी’चे सहा आणि जिल्ह्याबाहेरून प्रवास करून आलेला एक, असे एकूण 59 नागरिक करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, पुनवडी, ता. जावळी येथील 67 वर्षांच्या करोनाबाधिताचा क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. या बाधिताला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या 1754 झाली असून 1066 रुग्ण बरे झाले आहेत. करोनामुळे आतापर्यंत 66 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील 37 वर्षांची महिला व 15 वर्षांचे बालक, कोरेगाव येथील 30 व 36 वर्षांच्या महिला, वाठार किरोलीतील 17 वर्षांचा युवक, 31 वर्षांची महिला, नागझरी येथील 26 वर्षांचा तरुण, चिमणगावातील 45 वर्षांचा पुरुष, जावळी तालुक्यातील पुनवडी येथील 47, 34, 55, 48, 55, 47, 42, 50, 61, 47, 62 व 40 वर्षे वयाचे पुरुष, कुसुंबी मुरा येथील 30 वर्षांची महिला, सातारा तालुक्यातील 63 व 69 वर्षांच्या महिला, जिहे येथील 50, 34, 16 व 46 वर्षे वयाच्या महिला, 45 वर्षांचा पुरुष व दहा वर्षांचा मुलगा, सातारा शहरातील विमल रॉयल सिटीमधील 58 व 35 वर्षे वयाच्या महिला व आठ वर्षांची मुलगी, यादोगोपाळ पेठेतील 32 वर्षांचा युवक, राधिका रोड येथील 58 वर्षांचा पुरुष व 55 वर्षांची महिला, धनगरवाडीतील 28 वर्षांचा युवक व 45 वर्षांची महिला. करंडी येथील 36 वर्षांची महिला व 35 वर्षांचा युवक, फलटण तालुक्यातील सरडे येथील 55 व 20 वर्षे वयाच्या महिला, सासवड येथील 30 वर्षांचा युवक, हिंगणगाव येथील 32 वर्षांचा युवक, फलटण शहरातील रविवार पेठेतील 39 वर्षांची महिला, विंचुर्णे येथील 43 वर्षांचा पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 65, 23, 45, 70 व 32 वर्षे वयाच्या महिला, खटाव तालुक्यातील विठ्ठलवाडीतील 70 वर्षांची महिला. वाई तालुक्यातील परखंदी येथील 49 व 38 वर्षे वयाचे पुरुष, 38 वर्षांची महिला व आठ वर्षांचा मुलगा, नव्याचीवाडीतील 72 वर्षांचा वृद्ध, वाई शहरातील धर्मपुरी येथील 33 वर्षांचा युवक, चार वर्षांचे बालक व 34 वर्षांची महिला, अशा 59 नागरिकांच्या करोना चाचण्यांचे अहवाल रविवारी रात्री पॉझिटिव्ह आले. 503 जणांचे नमुने पाठविले तपासणीला क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 27, कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधील 76, उपजिल्हा रुग्णालयातील 60, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 13, वाई ग्रामीण रुग्णालयातील 55, शिरवळ करोना केअर सेंटरमधील 84, रायगाव करोना केअर सेंटरमधील 29, पानमळेवाडी करोना केअर सेंटरमधील 21, मायणी करोना केअर सेंटरमधील 22, महाबळेश्वर करोना केअर सेंटरमधील सहा, पाटण ग्रामीण रुग्णालयातील 38, खावली करोना केअर सेंटरमधील 28, दहिवडी करोना केअर सेंटरमधील 27, अशा एकूण 503 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनसीसीएस व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.