Corona In India : 24 तासांत देशभरात 41 हजार नवे रूग्ण; 507 जणांचा मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाची राजधानी दिल्लीत हाहाकार माजला होता. रूग्णांना बेड मिळत नव्हते व नंतर ऑक्सिजनचाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. मात्र आता राजधानी पूर्वपदावर येत असून गेल्या 24 तासांत केवळ 49 नव्या रूग्णांची नोंद झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट 0.008 टक्के इतका असून एका रूग्णाच्या मृत्यूनंतर तेथील करोना मृतांची संख्या आता 25,040 इतकी झाली आहे. दिल्लीत आता केवळ 585 सक्रिय रूग्ण असून होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या 176 आहे.
दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 41 हजार 383 नव्या रूग्णांची नोंद झाली असून 507 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 97.35 टक्के असून आतापर्यंत 41 कोटी 78 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे.




