कोरोनाची भीती; पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालय बंद
Updated On:

पुणे : कोरोनाच्या वाढत्या भितीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालय अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या आणि राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा जवळ आलेल्या असतांना अनेक विद्यार्थी जयकर ग्रंथालयात बसून अभ्यास करत होते, अशातच आज विद्यापीठाने कोरोनाच्या वाढत्या भीतीपायी ग्रंथालय बंद केले आहे.
सर्व विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील आपले साहित्य घेऊन जाण्यास सांगितले आहे तसेच सूचित करण्यात आले आहे की प्रशासनाचा पुढील आदेश येइपर्यंत जयकर ग्रंथालय बंद ठेवण्यात येणार आहे.
-विष्णू नाझरकर,
कॉलेज रिपोर्टर,
पुणे विद्यापीठ





