एकूण रुग्णसंख्या ११४५; सातारा शहरातील दोन बाधितांचा मृत्यू
सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात बुधवारी करोनाने कहर केला. एकाच दिवसात १०१ रुग्णांची बुधवारी नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १०१ झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा ३७ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने गुरुवारी सकाळी ११ वाजता देण्यात आली. सातारा शहरातील दोन करोनाबाधितांचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्यात मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या भाजीविक्रेत्याचा समावेश असल्याने सातरकरांची चिंता वाढली आहे.
बुधवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमधील ३८ जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये निकट सहवासातील २८, प्रवास करुन आलेले ६, सारी १, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग) २, आरोग्य सेवक १ यांचा समावेश आहे. यामध्ये २५ पुरुष व १३ महिलांचा समावेश आहे. तसेच सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
या ३८ जणांमध्ये खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील चव्हाण आळी येथील २० वर्षीय युवक व ५० वर्षीय महिला, शिरवळमधील शिंदेवाडी येथील ३६, २१ व ३० वर्षीय पुरुष, शिरवळ येथील २८ वर्षीय पुरुष,
कराड तालुक्यातील तारुख येथील ७० वर्षीय पुरुष, आगाशिवनगर मलकापूर येथील २४ व ३२ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील २९ वर्षीय पुरुष, कराड येथील २६ वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील सोनगीरीवाडी धोम कॉलनी येथील ५८ वर्षीय पुरुष व ११ वर्षीय युवक, २७ व ५५ वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील ७२ वर्षीय पुरुष व ४ वर्षीय बालक, २७ वर्षीय महिला व ८ वर्षीय बालिका, सोनजाई विहार बावधन नाका येथील १६, २०, ४० वर्षीय महिला, खानापूर येथील २७ वर्षीय पुरुष व ४९ वर्षीय महिला, शिरगाव येथील ३१ वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील शाहूनगर येथील २० वर्षीय युवक, जैतापूर येथील ३० वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका येथील ४८ वषीय् महिला, संगमनगर येथील १४ वर्षीय मुलगी, खावली येथील ४६ वर्षीय पुरुष, करंजे येथील ४० वर्षीय पुरुष, अपशिंगे येथील १८ वर्षीय युवक, कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील ३४ वर्षीय महिला व ६ वर्षीय बालिका, पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील ५५ वर्षीय पुरुष, काजरेवाडी, खाले येथील ३५ वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील घाडगेवाडी येथील ५८ वर्षीय पुरुष,
खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील २२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यू
सातारा शहरातील गुरुवार पेठूतील ५४ वर्षीय महिला व रविवार पेठेतील ४९ वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. ५४ वर्षीय महिलेस तीव्र मूत्रपिंडाचा आजार व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच ४९ वर्षीय पुरुष कोल्हापूर येथून प्रवास करुन आला असून त्याला अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता.
घेतलेले एकुण नमुने – १३५३३
एकूण बाधित – ११४६
घरी सोडण्यात आलेले – ७४३
मृत्यू – ४८
उपचारार्थ रुग्ण – ३५४