पुणे – शहरात नव्या करोना बाधितांची संख्या गेल्या दोन दिवसांत घटली होती. पण, बुधवारी हा आकडा 338 वर गेला आहे. तर, 317 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
बुधवारी दिवसभरात नोंद झालेल्या रुग्णांसह शहरात करोना बाधितांची एकूण बाधितसंख्या 1 लाख 72 हजार 897 झाली आहे. तर 1 लाख 63 हजार 296 रुग्णांना “डिस्चार्ज’ देण्यात आला. दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील पाच जण पुण्याबाहेरील आहेत.
तसेच आजपर्यंत एकूण 4,514 रुग्ण दगावले आहेत. सध्या ऍक्टिव्ह बाधित संख्या 5,087 असून, त्यातील 411 क्रिटिकल, तर 245 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. बुधवारी 3,708 नमुने घेण्यात आले.