काऱ्हाटी – येथे दहावीची परीक्षा मंगळवार (दि. 3) पासून सुरू झाली. कॉपीमुक्ततेसाठी सुपे (ता. बारामती) येथील परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना केंद्रात सोडण्यात आले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सुपा केंद्रात एकूण 410 विद्यार्थ्यांनी मराठीची प्रश्नपत्रिका सोडवली. या केंद्रात सुपे, कारखेल, देऊळगाव, नारोळी, खोर, पडवी या शाळेतील विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शाळेचे प्राचार्य एस. एस. भोईटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.