“सीएमई’तील विद्यार्थ्यांचे दीक्षांत संचलन

पुणे -लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीएमई) टेक्‍निकल एन्ट्री स्कीम अभ्यासक्रमाच्या 37 व्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत संचलन सोहळा शनिवारी (दि.12) पार पडला. या संचलनाची पाहणी महाविद्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. पी. मल्होत्रा यांनी केली.

महाविद्यालयातून 37 व्या तुकडीतील 33 विद्यार्थ्यांनी लष्करी अभियांत्रिकीचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. यामध्ये भूतान येथील एक आणि श्रीलंका येथील दोन सैनिकी अधिकाऱ्यांचाही समावेश होता. करोनामुळे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे करण्यात आले होते.

या संचलनाचे नेतृत्व विंग कॅडेट कॅप्टन अभिषेक चौहान याने केले.अभ्यासक्रमादरम्यान उत्कृष्ट कार्यासाठीचे सुवर्ण पदक विंग कॅडेट ऍडजुटंट साहिल कुमार, रजत पदक रॉय भूतान आर्मीचा कॅडेट सोनम शेरिंग याला तर कांस्य पदक विंग कॅडेट क्वाटर मास्टर प्रिन्स कुमार सिंग याला प्रदान करण्यात आले. तर महाविद्यालयाच्या इको प्लॅटूनला “उत्कृष्ट प्लॅटून’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.