डॉक्टरांचे योगदान विसरता कामा नये – ॲड. मनोज कडू

कोपरगाव – कोरोना काळात डॉक्टर, नर्सेस व त्यांचे संलग्न इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा भारतातील नागरिकांना दिली. त्याच्यामुळे त्यांचे योगदान कधीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष ॲड. मनोज कडू यांनी केले.
डॉक्टर डे औचित्य साधन लायन्स क्लब कोपरगावच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ उद्योजक तुलसीदास खुबानी, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुट्टे, डॉ.अतिश काळे, डॉ.तुषार गलांडे आदी मान्यवरांची भाषणे झाली.
याप्रसंगी डॉ.रणदिवे ,डॉ.विलास आचारी,डाॅ.काजल गलांडे, डॉ.विलास आचारी, डॉ.काजल गलांडे, राजेंद्र शिरोडे, परेश उदावंत, अंकुश जोशी, शाम जंगम, डॉ.अतिश काळे, डॉ.संजय उंबरकर, डाॅ. अमित नाईकवाडे, संदीप राशिनकर, संजय उदावंत, अनिकेत भडकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन लायन्स क्लबचे खजिनदार कैलास नागरे यांनी केले.





