Pimpri | द्रुतगती मार्गावर कंटेनर पलटी झाल्याने वाहतूककोंडी
Updated On:

मावळ, – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा कंटेनर पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बौर गावच्या हद्दीमध्ये बुधवारी (दि.२७) सकाळी हा अपघात घडला.
अपघातामध्ये कंटेनर रस्त्यावर पडल्याने त्याठिकाणी काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा पाटील व स्टाफने त्याठिकाणी धाव घेतली. आयआरबी कर्मचारी, महामार्ग पोलीस आदी यंत्रणांनी रस्त्यावरील कंटेनर बाजूला हटविला आणि वाहतूक सुरळीत केली.
टॅग्स:





