ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल
Updated On:

पुणे – ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. यामध्ये पुणे परिमंडळात हे प्रमाण 54 टक्क्यांवर पोहोचले असून गेल्या महिन्यात 12 लाख 17 हजार ग्राहकांनी 235 कोटी रुपयांची विजबीले ऑनलाइन भरली.
परिमंडळात गेल्या पंधरवड्यात वीजबिलांची रक्कम भरलेल्या एकूण ग्राहकांपैकी 57 टक्के जणांनी ऑनलाइन वीजबिल भरले. पुणे शहरात गेल्या महिन्यात 7 लाख 11 हजार (54.20 टक्के) ग्राहकांनी 136 कोटी रुपये, पिंपरी-चिंचवड शहरात 3 लाख (61 टक्के) ग्राहकांनी 63 कोटी रुपये तसेच मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागांमध्ये 1 लाख 82 हजार (44.35 टक्के) वीजग्राहकांनी 36 रुपयांचा ऑनलाइन भरणा केला आहे.





