ग्राहकांनो गणेशोत्सवापूर्वी सोने महागले..! जाणून घ्या, तुमच्या शहरातील ‘लेटेस्ट दर’

gold and silver price today । सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. शनिवारी बाप्पाचे आगमन होणार आहे. अशात आज आज शुक्रवार बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे तुमच्या शहरातील किंमती…
आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
सोने चांदीचे दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६६,१९३ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७२,२३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८४९ रुपये आहे म्हणजेच चांदी ८४,८७० रुपये किलोनी विकली जात आहे.
गुरुवारी सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी ७२,१९० रुपये होता आणि चांदीचा दर ८४,८९० रुपये प्रति किलो होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की आज सोने ४० रुपयांनी महागले असून चांदीच्या दरात २० रुपयांची घट झाली आहे.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,१०१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,११० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,११० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,११० रुपये इतका आहे.
नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,११० रुपये आहे.
gold and silver price today । सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.
gold and silver price today । हॉलमार्ककडे लक्ष द्या
सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.




