nagar | भाजप चारशे पार झाल्यास संविधान बदलणार- जयंत पाटील

जामखेड, (प्रतिनिधी) – भाजपजयंत पाटील यांची टीकाने जीएसटीच्या माध्यमातून जनतेचा खिसा कापला आहे. सर्व वस्तूवर जीएसटी लावला आहे. आतापर्यंत जनतेची लूट केली आहे. भाजपच्या काळात देश हा अराजकतेकडे चालला आहे.
कोट्यवधी रुपयांचे कर्ज करून उद्योगपतींचे पंचवीस लाख कोटी रुपये कर्जे माफ केली. यावेळी भाजपला चारशे पार निवडून दिले तर भाजप संविधान बदलायला कमी करायचा नाही, अशी घणाघाती टीका शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जयंत पाटील बोलत होते आ. रोहित पवार, आ. भास्कर जाधव, भूषणसिंह राजे होळकर, नीलेश कराळे मास्तर, काॅंग्रेसचे मुंढे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर,
पंचायत समितीच्या मा. सभापती राजश्री मोरे, संजय वराट, सुर्यकांत मोरे, चंद्रकांत राळेभात, सुनील लोंढे, राहुल उगले, रमेश आजबे, नय्युम शेख, हरिभाऊ आजबे, आण्णासाहेब सावंत, राजेंद्र पवार, सुरेश भोसले, वैजिनाथ पोले, हर्षल डोके, कविता महात्रे, अंजली ढेपे, रोहिणी गोलेकर, उमर कुरेशी, राजेंद्र गोरे, जावेद सय्यद, संतोष नवलाखा, प्रशांत राळेभात, आमित जाधव, प्रकाश सदाफुले, आमर चाऊस, युवराज उगले, वसीम सय्यद, गणेश हगवणे, शरद शिंदे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, रामहरी गोपाळघरे, मोहन पवारसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. रोहित पवार म्हणाले की, कर्जतच्या सभेत अजित पवार म्हणाले मी कर्जत-जामखेडसाठी निधी दिला मात्र शरद पवार, उद्धव ठाकरे व कॉंग्रेस पक्षाने सहकार्य केले, त्यामुळे खरा निधी मिळाला आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या माझ्या विरोधातील वक्तव्यास अजितदादांनी चूना लावला.
कोरोना काळात जनतेला धीर देण्याऐवजी शिंदे यांना बंगल्यातील झाडे महत्त्वाची वाटली. जनतेमध्ये माझे वजन वाढले आहे. राम शिंदे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माझ्यासमोर उभेच राहू शकणार नाहीत. माझे काम जनतेच्या हृदयात आहे. त्यामुळे माझा पराभव त्यांना शक्य नाही, असेही ते म्हणाले.




