काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे पाकिस्तानचे योजनापत्र – नरेंद्र मोदी

गोंदिया – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धडाकाच सुरु केला असून महाराष्ट्रातील आपल्या दुसऱ्या जाहीर सभेत विरोधकांवर तुफान टीका केली आहे. आपण घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा निर्णयच घेतला असल्याचे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या योजनेचा भाग असल्याची टीका केली.

यावेळी नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत दिल्ली मध्ये बसलेले लोक रोज नव्या गोष्टी सांगत आहेत. लोक बालाकोट विसरले असे म्हणत आहेत. मात्र देश अजून १९६२ चे युद्ध विसरलेला नाही तर मग बालाकोट कसे विसरतील, असे नरेंद्र मोदी म्हणाले. आपल्यासाठी पक्ष हा नंतर आणि देश सर्वप्रथम असल्याचे सागंत काँग्रेसने देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली. काँग्रेसकडून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप यावेळी नरेंद्र मोदींनी केला.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवारांना नरेंद्र मोदींनी प्रश्न विचारत, काँग्रेसचा जाहीरनामा तुम्हाला मान्य आहे का? तसेच तुम्ही तर देशाचे संरक्षण मंत्री सुद्धा होता. मग गप्प का? असा सवाल उपस्थित केला. मागील पाच वर्षे यूपीए सरकारच्या चुका सुधारण्यातच गेली असल्याचे सांगत तुमच्या सहकार्याने विकासाचा नवा हायवे तयार होईल असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.

पूर्वी युरिया खताचे आणि शेतकऱ्यांचे पैसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे जात असल्याचा आरोप मोदी यांनी केला. शहरी नक्षलवाद्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी घालत आहे, असे सांगत ‘तिहार’मधून गौप्यस्फोट होईल याच भीतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली असल्याची टीका मोदी यांनी केली आहे.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.