Kangana Ranaut | संसदेत निवडणूक सुधारणा या विषयावर चालू असलेल्या चर्चेदरम्यान भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले विधान चांगलेच चर्चेत आले. काँग्रेसकडून ईव्हीएमवर सतत होत असलेल्या टीकेला उत्तर देताना कंगनांनी आपला स्पष्ट सूर मांडत ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपांवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. लोकसभा सत्रात 9 डिसेंबर रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मिलीभगतीचा आरोप करत मोदी सरकारवर हल्ला चढवला. याच पार्श्वभूमीवर कंगनांनी संसदेत प्रत्युत्तर देताना EVM नव्हे, तर पंतप्रधान मोदी लोकांचे हृदय हॅक करतात हे कॉंग्रेसवाल्यांना समजत नाही असे विधान करून विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर दिले. लोकसभेत एसआयआरवरील चर्चेदरम्यान बोलत त्या होत्या. त्या म्हणाल्या की जुनी मतदान पद्धत तितकीही शुद्ध नव्हती, त्या काळातही गडबडी होत आणि मतपेट्या उचलून नेण्याचे प्रकार घडत असत. राहुल गांधींच्या जर्मनी भेटीबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. मी त्यांच्या (राहुल गांधी) दौऱ्यांचा मागोवा ठेवत नाही आणि त्यांच्याबद्दलच्या कोणत्याही बातम्या मी वाचत नाही. त्यांच्या बातम्या नेहमीच निरुपयोगी असतात. त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही अशी टिप्पणी त्यांनी केली.