मोदींविरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्या काँग्रेसला फेसबुककडून ‘धडा’ : रविशंकर प्रसाद

फेसबुकचे सायबर सेक्युरिटी प्रमुख नथॅनियल ग्लेशर यांनी आज फेसबुकातर्फे करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहिती दिली असून, लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक लक्षात घेऊन काँग्रेसशी संबंधित असणाऱ्या काही फेसबुक पेजेसवरून जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबाबत तसेच सत्ताधारी भाजप बाबत माहिती पुरवली जात होती मात्र ही फेसबुक पेजेस फेक अकाउंट्सच्या माध्यमातून चालविण्यात येत असल्याचे फेसबुकच्या लक्षात आल्याने फेसबुकतर्फे काँग्रेस आयटी सेलशी निगडित असणाऱ्या ६८७ फेसबुक पेजेसवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, फेसबुकने केलेल्या या कारवाईवरून भाजपचे जेष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला असून ते म्हणतात, “फेसबुकतर्फे आज करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत महत्वाची असून काँग्रेस आयटी सेलशी संबंधित असणाऱ्या या ६८७ फेसबुक पेजेसचे वापरकर्ते फेक अकाऊंटच्या माध्यमातून ही पेजेस वापरत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या पेजेसच्या माध्यमातून काँग्रेस मोदींविरोधात खोटा प्रचाराचे काम करत होते तसेच काँग्रेसतर्फे या पेजेसच्या माध्यमातून आपल्याला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे भासवण्यात येत होते मात्र आज त्यांच्या या करतूदीमागील सत्य जनतेसमोर आले आहे.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.