मुंबई : महाराष्ट्रातील २९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि क्रिकेटपटू-राजकारणी मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मंगळवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट, पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी हेही प्रमुख प्रचारक असतील. याशिवाय राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेते विविध भागांत प्रचार करणार आहेत. मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार असून, निकाल १६ जानेवारीला जाहीर केला जाईल. २,८६९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांत ३.४८ कोटींपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाचा समावेश प्रभारी रमेश चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार खासदार छत्रपती शाहू महाराज विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनीक तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन खासदार रजनीताई पाटील गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर खासदार प्रणिती शिंदे आमदार अमिन पटेल माजी मंत्री डॉ. नितीन राऊत माजी मंत्री सुनिल केदार आमदार अमित देशमुख आमदार विश्वजित कदम आमदार भाई जगताप