काँग्रेस सोडलंय पण भाजपात प्रवेश करणार नाही : अल्पेश ठाकोर

लोकसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी  काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळे अल्पेश ठाकोर आता भाजपात सामील होणार की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आता स्वतः अल्पेश ठाकोर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून “काँग्रेस सोडले असले तरी देखील आपण भाजपात प्रवेश करणार नाही.” असं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, अल्पेश ठाकोर यांच्यासोबतच आणखीन दोन आमदारांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला असून धवलसिंह ठाकोर आणि भारतजी ठाकोर अशी त्यांची नावे आहेत. अल्पेश ठाकोर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, “आम्ही तिघांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी आम्ही आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असून आमच्यापैकी कोणीही भाजपमध्ये प्रवेश करणार नाही.” अशी माहिती देखील दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.