कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुणे दौऱ्यावर

मगरपट्टा सिटीत विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

पुणे – ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत.

युवा स्वराज्य प्रतिष्ठाण व एनएसयुआय यांनी संयुक्तरित्या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हडपसर येथील लक्ष्मी लॉन्सवर सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी गांधी गुरुवारी रात्री नऊ वाजता पुण्यात आले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसच्या सेक्रेटरी सोनल पटेल, आमदार विश्‍वजीत कदम, संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, उल्हास पवार, अरविंद शिंदे, एनएसयुआयचे अध्यक्ष अमीर शेख हे पदाधिकारी विमानतळावर त्यांना घेण्यासाठी उपस्थित होते. गांधी यांचा राजकिय दौरा नसून ते केवळ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात या कार्यक्रमानंतर लोकसभा निवडणुकीबाबत पक्षातील नेत्यांशी त्यांची चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.