Congress News : केरळमध्ये सरकार स्थापनेसाठी सरसावलेल्या कॉंग्रेसने (Congress News) नवा राजकीय फंडा अवलंबल्याचे पाहावयास मिळाले. शपथविधी सोहळ्याआधीच मंत्र्यांची नावे जाहीर करण्याचे अनोखे पाऊल पक्षाने उचलले. नियोजित मुख्यमंत्री व्ही.डी.सतीशन यांनी रविवारी त्यांच्या नव्या टीममधील (Congress News) मंत्र्यांच्या नावांची घोषणा केली. त्यामुळे रमेश चेन्निथला, के.मुरलीधरन आणि सनी जोसेफ हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्रिपदांची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले. पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते टी.राधाकृष्णन यांच्याकडे विधानसभेच्या सभापतीपदाची धुरा सोपवली जाईल. Congress News कॉंग्रेसने (Congress News) मित्रपक्षांशी चर्चा करून मंत्र्यांची नावे निश्चित केली. नव्या मंत्रिमंडळात कॉंग्रेसच्या मित्रपक्षांनाही प्रतिनिधित्व मिळाले आहे. कुठल्याही मंत्रिमंडळाची रचना होताना मोठा सस्पेन्स निर्माण झालेला असतो. विविध पक्षांच्या स्तरांवरून मंत्री निश्चित करताना गोपनीयता बाळगली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष शपथविधीवेळीच मंत्र्यांची नावे उघड होतात. त्या पद्धतीला फाटा देण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला आहे. केरळमधील मुख्यमंत्री निवड करण्याविषयीचा निर्णय काहीसा लांबला. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये आणि मित्रपक्षांत अस्वस्थता निर्माण झाल्याचेही समोर आले. त्या पार्श्वभूमीवर, शपथविधीपूर्वी मंत्र्यांची नावे जाहीर करून कॉंग्रेसने डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.