बच्चू कडू यांनी उघडपणे सांगितले,’येत्या दोन दिवसात कांँग्रेसचे आमदारही येणार अन् संख्याबळ ५० च्या वर होणार..’

मुंबई – विधान परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला आलेल्या अपयशाचा धक्का पचतो न पचतो तोवरच शिवसेना व पर्यायाने मविआला मोठा धक्का बसला आहे.शिवसेनेचे ठाण्याचे व संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचे शिलेदार म्हणून ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड उभा केलं आहे. शिंदेंच्या या बंडाला थोड्या थोडक्या नव्हे तर ४० आमदारांचं बळ असल्याचं ते सांगतात.
यामध्ये प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचाही समावेश आहे. तसेच प्रहार संघटनेचे 2 आमदारांचाही समावेश यात आहे. अशातच या संपूर्ण घटनेवर माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू यांनी मोठा खुलासा केला आहे.
ते म्हणाले,’आमच्या सोबत येत्या दिवसात आणखी काही आमदार दाखल होणार आहे यातमध्ये काँग्रेस पक्षातील आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे एकूण आमदारांची संख्या ५० पर्यंत नक्कीच जाईल. काँग्रेस पक्षातील काही आमदार सोबत येणार आहे. असा दावा बच्चू कडू यांनी यावेळी केला. बच्चू कडू यांनी पत्रकरांशी बोलतांना बच्चू कडूंनी बंड पुकारण्या मागची प्रमुख कारण सांगितले
ते म्हणाले,’आमच्यासोबत असलेले सर्व आमदार खुश आहेत. आम्ही शिवसेनेला समर्पित होतो. आम्हाला कोणतीही व्यक्तिगत नाराजी नाही. निधीतली विषमता आहे, शिवसेनेने त्याकडे लक्ष दिलेलं नाही. असे कारण बच्चू कडू यांनी सांगितलं.’





