Political News : धारवाड शहरात काँग्रेस नेते फिरोज पठाण यांची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Firoz Pathan Murder) मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही घटना घडली. हाश्मीनगर भागात राहणारे फिरोज पठाण हे गाढ झोपेत असताना चार अज्ञात हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले. त्यांनी धारदार शस्त्राने सपासप वार करत पठाण यांचा जागीच खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाले. (Political News) ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून, त्याच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासात ही हत्या जुन्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Firoz Pathan Murder) घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे धारवाड परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Political News) हेही वाचा : Congress News : महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघणार; काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल