काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा खांदा फ्रॅक्चर; रुग्णालयात दाखल

नागपूर – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सकाळी मॉर्निंग वॉक घेताना पडल्याने यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, थोरात यांचा खांदा फ्रॅक्चर झाला असून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येत आहे.
माजी मंत्र्यांचे पुण्यातील फॅमिली डॉक्टर मुंबईत त्यांच्यावर उपचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरातील आमदार वसतिगृहाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. संजीव धवड यांनी सांगितले की, थोरात सकाळी साडे सात ते आठ या वेळेत मॉर्निंग वॉक करताना पाय घसरून पडले होते. त्यावेळी त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्याच्या कपाळावर जखमा होत्या. आम्ही प्राथमिक उपचार करून त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये हलवले,असे त्यांनी सांगितले.
आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल येथे मॉर्निंग वॉक करताना पडल्यामुळे माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचे कारण नाही. मी पुढील उपचार फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मुंबईत घेणार आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 26, 2022





