Ashish Shelar : ‘सीजेपीचा बोलवता धनी काँग्रेस’; आशिष शेलारांचा मोठा दावा म्हणाले “फर्मान आलं की…”
Ashish Shelar : भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी गप्प का आहेत, असा सवाल करत सीजेपीचा बोलवता धनी काँग्रेस असल्याचा मोठा दावा केला आहे.

Ashish Shelar on Congress : झारखंड राज्यातील रांचीमध्ये विद्यार्थ्यी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज १८ दिवस असून सरकारने आंदोलनकर्त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, आंदोलक विद्यार्थी सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम असून मागे हटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
काल या प्रकरणी झारखंड विधानसभेवर आंदोलन विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुरांचा मारा केला. याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.
यानंतर पुन्हा एकदा राजकारण तापले असून, भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी गप्प का आहेत, असा सवाल करत सीजेपीचा बोलवता धनी काँग्रेस असल्याचा मोठा दावा केला आहे.
“सीजेपीला १७ दिवस तिकडच्या विद्यार्थ्यांचे हित दिसले नाही; कारण त्यांचा बोलवता धनी त्यांचा मालक त्याला फर्मान देत नाही. असं आम्ही समजायचं का? मालकाने, बोलवत्या धन्याने फर्मान दिल्यानंतर ही सीजेपीची मंडळी आपल्या जागेवरुन हलणार.” असा मोठा दावा आशिष शेलार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यासोबत त्यांनी काँग्रेसला विद्यार्थी-तरुणांशी काहीच देणं घेणं नाही हे आता स्पष्ट झाले असल्याचे देखील म्हटले आहे.
ज्या ठिकाणी राजकीय द्वेष पसरवता येईल, त्या राजकीय द्वेषाचे जनक काँग्रेस आणि राहुल गांधी आहेत, असा थेट आरोपच आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रांचीच्या आंदोलनाकडे पाठ आणि जंतर मंतरच्या आंदोलनाकडे तोंड या दोन भूमिका त्यांच्या (काँग्रेस) दुटप्पीपणा स्पष्ट करण्याऱ्या आहेत, असा दावाही त्यांनी केला.
विद्यार्थी हित, तरुणांचे भविष्य, परीक्षेमधील पारदर्शकता आणि रोजगार या विषयाला अनुसरुण पाठिंबा देणाऱ्या बऱ्याच संघटना आहेत. त्या आज रांचीला पाठ का दाखवत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रांचीमधील विद्यार्थी आंदोलनावर भाष्य करताना आशिष शेलारांनी काँग्रेस आणि राहुल गांधीला लक्ष्य करत सीजेपीचे नाव घेत मोठा दावा केल्याने याविषयी काँग्रेसकडून आणि सीजेपीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Pune Crime News: ‘आखाड पार्टी’त तडीपार गुंडाचा धुमाकूळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल






