काँग्रेसकडून अपेक्षा नाही पण शरद पवारांना हे शोभतं का? – मोदी 

लातूर :  काँग्रेसला जम्मू-काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवा आहे. शरदराव तुम्ही अशा लोकांसोबत उभे आहेत. काँग्रेसकडून देशाला कोणतीच अपेक्षा नाही. पण शरद पवारांना हे शोभतं का? असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारले आहे. लातूरमधील औसामध्ये आज युतीची सभा झाली.  नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ३ वर्षाने एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि महाआघाडीवर सडकून टीका केली.

नरेंद्र मोदी म्हणाले कि, दहशतवाद्यांच्या त्यांच्या तळांवर घुसून मारू, अशी नव्या भारताची निती आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही एक विश्वास निर्माण केला असून, तेथील परिस्थिती सामान्य होत आहे. नक्षलवाद्यांवर प्रहार केला असून, आदिवासींच्या विकासासाठी दिवस-रात्र काम केले जात आहे. तुमचे आशीर्वादच माझी ताकद आहे. संस्कृती, परंपरा यांचे रक्षण केले पाहिजे की नाही. चौकीदारावर तुमचा विश्वास आहे ना?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

काँग्रेसने जर देशाची फाळणी होऊ नसती तर पाकिस्तान निर्माणच झाला नसता. काँग्रेसने आपला चेहरा आरशात पहावा कारण त्यांना मानवाधिकाराची भाषा शोभत नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचाही मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काश्मीरमधील फुटिरतावाद्यांसोबत आहे. काँग्रेसकडून लोकांना आता अपेक्षा नाही, मात्र शरदराव तुम्ही तरी हे शोभतं का? असा सवालही यावेळी त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.