प्रभात वृत्तसेवा पुणे/मार्केटयार्ड, दि. 20 – शिक्षणामुळेच प्रगती होते. प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रेरणादायी ठरेल, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी व्यक्त केले. “जयराज ग्रुप’तर्फे संस्थापक स्व. हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजातील गरजूंसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत शहरातील कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतच्या सदस्यांच्या दहावी व बारावीमध्ये 75 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या पाल्यांचा सत्कार करण्यात. यावेळी 20 विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गैरविण्यात आले. कार्यक्रमास दी पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, पूना हॉस्पिटलचे ट्रस्टी नैनेश नंदू, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या अध्यक्ष नमिता नाईक, जयराज ग्रुपचे राजेश शहा आणि धवल शहा, विलास भुजबळ, माथाडी हमाल पंचायतचे गोरख मेंगडे व्यासपीठावर उपस्थित होते. गरड म्हणाले, ही शिष्यवृती दहावीच्या परीक्षेत नुकतेच यशस्वी झालेल्या विध्यार्थ्यांना त्यांचा पुढील शिक्षणास सहाय्यभूत व प्रेरणादायी ठरणार आहे. बाठिया यांनी सर्व सामान्य, तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी मदत केल्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. तर, राजेश शहा यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्सहन दिले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्या दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विवेक कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे नितीन नाईक, मिलिंद कुलकर्णी, पूना मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष दीपक बोरा, सचिन नहार, नितीन नहार, दिलीप रायसोनी आदी उपस्थित होते.