कार्ती चिदंबरम यांना विदेश जाण्यास सशर्त परवानगी
Updated On:

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया मनिलॉंड्रिंग प्रकरणातील आरोपी असलेले कार्ती चिदंबरम यांना कोर्टाने एक कोटी रुपये जमा करण्याच्या अटीवर विदेशात जाण्याची अनुमती दिली आहे. कार्ती चिदंबरम हे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत.
25 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ते परदेशात जाणार आहेत. ते नेमके कोणत्या ठिकाणी जाणार आहेत याची माहिती त्यांनी तपास यंत्रणांना आधीच देऊन ठेवावी असा आदेशही कोर्टाने त्यांना दिला आहे.
या आधीही कार्ती चिदंबरम फेब्रुवारी 2021 मध्ये विदेश दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांना दोन कोटी रुपयांची अनामत कोर्टात जमा करण्याचा आदेश देण्यात आला होता. कार्ती चिदंबरम हे कॉंग्रेसचे खासदारही आहेत.



