Dainik Prabhat
Friday, February 3, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

भात उत्पादकांवर चिंतेचे सावट

by प्रभात वृत्तसेवा
August 3, 2020 | 11:55 am
A A
खेडमध्ये भात लावणीला वेग

प्रातिनिधिक

भाताच्या कोठारात पावसाचा “लॉकडाऊन’
चार हजार हेक्‍टर क्षेत्रावरील लागवड रखडली
मावळात जुलैअखेर 69 टक्‍के क्षेत्र लागवडीखाली
पाऊस लांबल्यास उत्पन्नात घट होण्याची शक्‍यता
पिंपरी (प्रतिनिधी) –
पावसाने उघडीप दिल्यामुळे मावळ तालुक्‍यातील भातशेती संकटात सापडली आहे. जुलैमध्ये सरासरीपेक्षा निम्म्याहून कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या मावळातील भातशेती दमदार पावसाची प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी तालुक्‍यातील 31 टक्‍के भातपिकाची अद्याप लागवड झालेली नाही, त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यावर चिंतेचे ढग दाटले आहे. जुलैमध्ये निराशा केल्यानंतर ऑगस्ट उजाडला तरी पाऊस नसल्याने बळीराजाचे आभाळाकडे डोळे लागले आहे. पुढील काही दिवस पावसाने “लॉकडाऊन’ पाळल्यास उत्पादनात घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

मावळ तालुक्‍यात 15 हजार 500 हेक्‍टर हे खरीप क्षेत्र आहे. त्यापैकी भात पिकासाठी 12 हजार 105 हेक्‍टर क्षेत्रावर उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यापैकी 8 हजार 417 हेक्‍टरवर लागवड पूर्ण झाली. त्यामध्ये पारंपारिक भात लागवड (7,312), चारसूत्री (909), सगुणा राईसतंत्र (161), यांत्रिकीकरणाद्वारे लागवड (35) अशा पद्धतीने वेगवेगळ्या महसुली क्षेत्रात लागवड केली आहे.

भात पिकासाठी इंद्रायणी हे वाण प्रामुख्याने घेतले जाते. तसेच फुले समृद्धी, कोळंब, आंबेमोहर आणि स्थानिक वाण यांचेही काही प्रमाणात पीक घेतले जाते. पिकाचे चांगले उत्पादन व्हावे, याकरिता शेतकरी कृषी विभागाच्या मदतीने भात लागवडीकरिता चारसूत्री तंत्रज्ञान वापरत आहेत. यावर्षी चारसूत्री, एसआरटी आणि यांत्रिकीकरण याद्वारे लागवडी केल्या जात आहेत. चारसूत्री शेती तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्‌या कार्यक्षम आणि एकूण लागवडीचा म्हणजे बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्‍चितपणे फायदेशीर ठरत असल्याने शेतकरी चारसूत्री लागवडीला प्राधान्य देत आहेत.

पूर्वभागात सोयाबीन पीक घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वडगाव आणि तळेगाव दाभाडे महसूल मंडळ परिसर कमी पावसाचा आहे. त्यामुळे या भागातील बहुतेक शेतकरी सोयाबीन पिकाला पसंती देत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये इंदोरी, आंबी, तळेगाव, सुदुंबरे, जांभवडे, सोमाटणे, दारूंब्रे, गोडुंब्रे, गहुंजे, साळुंब्रे, चांदखेड, आढले, बेबड ओहोळ, परंदवडी गावांचा समावेश होतो.

नाचणी, भुईमुगाचे क्षेत्र निम्म्याने घटले
राज्यासह मावळात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत असले तरी दुसरीकडे नाचणी आणि भुईमूग पिकाचे क्षेत्र निम्याने घटल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. भुईमूगाचे 1500 हेक्‍टर सरासरी असताना जुलैअखेर अवघे 134 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे पीक वडगाव, तळेगाव, शिवणे या महसूल मंडळामध्ये मुख्यत्वे घेतले जाते. उर्वरित कार्ला, खडकाळा आणि काळे कॉलनी या भागात पेरणीचे प्रमाण अत्याल्प पाहावयास मिळते. दुसरीकडे गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी नाचणी पीक घेण्याकडे काणाडोळा केल्याचे दिसून येत आहे. यंदा 100 हेक्‍टरवर उद्दिष्ट ठेवले असताना आजपर्यंत केवळ 19 हेक्‍टरवर नाचणीचा पेरा झालेला दिसतो.

सोयाबीनचा पेरा दुपटीने वाढला
मावळातील वडगाव, तळेगाव दाभाडे, खडकाळे, कार्ला, काळे कॉलनी, लोणावळा, शिवणे हे सात महसूली मंडळ आहेत. यापैकी वडगाव आणि तळेगाव दाभाडे मंडळात सर्वाधिक कमी पाऊस पडतो. त्यामुळे या भागातील शेतकरी सोयाबीन पिकाला पसंती देतो. याशिवाय सोयाबीन हे कमी पावसाचे पीक मानले जाते. पोषक वातावरण आणि कमी पावसात भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक असल्याने बळीराजा गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनकडे वळालेला दिसतो. गतवर्षी 250 हेक्‍टरवर हे पीक घेतले, यंदा जुलैअखेर 490 हेक्‍टर क्षेत्रावर पेरा झाला असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.

सध्या मावळ तालुक्‍यातील शेतकरी दमदार आणि भीज पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये सरासरी 498 मि.मी. पाऊस पडतो, यंदा मात्र अवघा 314 मि.मी. पावसाची नोंद झाली. अर्थात 63 टक्‍के पाऊस पडला. कडधान्यासह अन्य पिकांची पेरणी आणि भाताची लागवड 69 टक्‍क्‍यांपर्यंत झाली असली तरी प्रत्यक्षात उर्वरित लागवडीबरोबरच झालेल्या लागवडीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे. तालुक्‍यात पावसाचा शिडकावा होत असला तरी प्रत्यक्षात या पावसाने पीक जगतात. परंतु खाचरं भरत नाहीत आणि खाचरं भरली नाही, तर उर्वरित क्षेत्रावर लागवड कशी होणार अशी चिंता निर्माण झाली आहे. पावसाचा काळ जेव्हढा लांबला जाईल, तेव्हढे उत्पादन
घटणार आहे.
– देवेंद्र ढगे, कृषी अधिकारी, मावळ.

कृषी विभागाचे आवाहन
जून महिन्यात 188 मि.मी. सरासरी असताना 239 मि.मी. पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये यापेक्षा उलट स्थिती पाहवयास मिळाली. सरासरी 498 मि. मी. असताना 314 मि.मी. इतका पाऊस आला. अर्थात केवळ 63 टक्‍के पर्जन्यमान दिसून आले. आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. ऑगस्टमध्ये सरासरी 309 मि.मी. पाऊस पडतो. मात्र गेल्या दोन दिवसांत पाऊस गायब झालेला दिसतो. यंदा पाऊस कमी असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. काळजी करू नये. मात्र सध्या सुरू असलेली लागवडीत थोडा बदल करावा. शेतकरी एकावेळी 4-5 रोपांची एकावेळी लावतात. मात्र त्याऐवजी 6-7 रोपांची लागवड करावी, असे आवाहन मावळ कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Tags: Concernsoverpimpri chinchawad newsrice growers

शिफारस केलेल्या बातम्या

“माध्यमांना वार्तांकन करण्यापासून थांबवू शकत नाही”; निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा झटका
Top News

समाजात द्वेष पसरवणाऱ्या ‘अँकर’ना पडद्यावरून दूर करा ; सर्वोच्च न्यायालयाने वाहिन्यांना सुनावले

3 weeks ago
मोठी बातमी! ज्येष्ठ नेते, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
Top News

मोठी बातमी! ज्येष्ठ नेते, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

1 month ago
UK-China Relations : चीनबरोबरचे सोन्याचे युग आता समाप्त – ऋषी सुनक
आंतरराष्ट्रीय

UK-China Relations : चीनबरोबरचे सोन्याचे युग आता समाप्त – ऋषी सुनक

2 months ago
शिवसेनेवरील दावा; शिंदे गटाविरुद्ध उद्धव ठाकरेंनी उचलले मोठे पाऊल; निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्देशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव
Top News

मोठी बातमी! राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी; आजचा युक्तिवाद पूर्ण

6 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

PM Modi Foreign Visits : पाच वर्षांत पंतप्रधानांचे 21 परदेश दौरे; दौऱ्यांवर झाला ‘इतका’ खर्च

Vidarbha : अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. प्रमोद येवलेंकडे सुपूर्द

सरस्वती मंदिर संस्थेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

जाणून घ्या! हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींचे किती झाले नुकसान? आकडा वाचून व्हाल थक्क

Most Popular Today

Tags: Concernsoverpimpri chinchawad newsrice growers

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!