satara | चंद्रकांत खराटे यांच्याकडून बुध शाळेला संगणक भेट
Updated On:

पुसेगाव, (प्रतिनिधी) – बुध, ता. खटाव येथील रहिवासी आणि पोस्टमास्तर चंद्रकांत खराटे यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तीन संगणक संच भेट म्हणून दिले. या संगणकांचे उद्घाटन सौ. कांचन चंद्रकांत खराटे यांच्या हस्ते करण्यात आले.
उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभयसिंह राजेघाटगे, माजी प्राचार्य के. डी. पवार, दयानंद जगदाळे, प्रीती त्रिपुटे, भाग्यश्री बागवडे, सौ. प्रिया साळुंखे, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शशिकांत घाटगे, शिवाजी देसाई, दत्तात्रय जाधव,
उमा रणसिंग, दीपाली घनवट, संग्राम कांबळे, अनिता मोरे, भोसले उपस्थित होते. मुख्याध्यापक जितेंद्र जगताप यांनी प्रास्ताविक केले. दमयंती अब्दागिरे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन घनवट यांनी आभार मानले.





