‘कंपास’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! प्लॅनेट मराठीच्या नव्या वर्षातील नव्या थ्रिलर वेब सिरीजची सुरुवात

मुंबई – हटके आणि दर्जेदार कंटेंट घेऊन येणारा मराठीतील प्लॅनेट मराठी हा प्लॅटफॉर्म लवकरच एक मल्टी स्टारर ‘कंपास’ नावाची वेब सिरीज घेऊन येत आहे. या वर्षाची सुरुवात प्लॅनेट मराठीने सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘कंपास’ या वेबसीरिजने केली आहे.नुकताच या वेबसीरिजचा मुहूर्त सोहळा मुंबईत पार पडला आणि शुटींगची सुरुवात झाली.
‘कंपास’ हा खूप वेगळा विषय असून यात कसलेल्या कलाकारांची दमदार फळी आहे. ‘कंपास’ हे नावाच खूप निराळे असून यात प्रेक्षकांना जबरदस्त क्राईम थ्रिलर पाहायला मिळणार आहे.प्लॅनेट मराठीने आणलेला प्रत्येक कंटेंटला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याचे मत प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी व्यक्त केले.
View this post on Instagram
अशी क्राईम थ्रिलर सिरीज या आधी मराठीमध्ये तुम्ही पहिली नसेल असं दिग्दर्शक सुश्रुत भागवत म्हणाले.कंपासच्या मुहूर्तासाठी उर्मिला कानेटकर – कोठारे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, पौर्णिमा डे, खुशबू तावडे, सुयश टिळक, आनंद इंगळे, संजय मोने आदी कलाकारांसह निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि संतोष रत्नाकर गुजराथी उपस्थित होते.





