Motorola Edge 70 Neo: कॉम्पॅक्ट फोन, 50MP चे तीन कॅमेरे अन् 68W चार्जिंग; Motorola Edge 70 Neo ची जोरदार एंट्री!
Motorola Edge 70 Neo कॉम्पॅक्ट डिझाइन, दमदार प्रोसेसर, 50 मेगापिक्सलचे कॅमेरे आणि वायरलेस चार्जिंग यांसारख्या फीचर्समुळे हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये चर्चेत आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

Motorola Edge 70 Neo: मोटोरोला आपल्या Edge सीरिजमधील आणखी एक स्मार्टफोन भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. Motorola Edge 70 Neo हा फोन येत्या काही महिन्यांत भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने आपल्या IFA 2026 लाइनअपमध्ये या फोनचा उल्लेख केला आहे. मात्र, फोनची अधिकृत लॉन्च तारीख आणि सर्व स्पेसिफिकेशन्स कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाहीत.
कॉम्पॅक्ट डिझाइन, दमदार प्रोसेसर, 50 मेगापिक्सलचे कॅमेरे आणि वायरलेस चार्जिंग यांसारख्या फीचर्समुळे हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये चर्चेत आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
IFA 2026 मध्ये फोनची झलक
मोटोरोला यांनी IFA 2026 कार्यक्रमातील आपल्या लाइनअपची माहिती देताना Edge 70 Neo चा उल्लेख केला. या कार्यक्रमात कंपनीने Edge 70 Plus, Watch Ultra आणि Snap Wireless Charger यांसारख्या उत्पादनांवर अधिक भर दिला. मात्र, Edge 70 Neo लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. सध्या फोनची लॉन्च तारीख समोर आलेली नाही. त्यामुळे या स्मार्टफोनच्या किंमतीबाबतही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. लीक आणि रिपोर्ट्समधून त्याच्या संभाव्य फीचर्सची माहिती समोर येत आहे.
6.3 इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले
Motorola Edge 70 Neo मध्ये 6.3 इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. या स्क्रीनला 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळू शकतो. त्यामुळे स्क्रोलिंग, व्हिडिओ पाहणे आणि गेमिंग करताना स्क्रीनचा अनुभव चांगला मिळण्याची अपेक्षा आहे. फोनचे डिझाइन तुलनेने कॉम्पॅक्ट असण्याची शक्यता आहे. मोठ्या स्क्रीनच्या फोनपेक्षा हातात सहज मावणारा स्मार्टफोन पसंत करणाऱ्या युजर्ससाठी हा पर्याय आकर्षक ठरू शकतो.

Motorola Edge 70 Neo
MediaTek Dimensity 7450 प्रोसेसर
परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये MediaTek Dimensity 7450 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. रोजच्या वापरातील कामे, मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी हा प्रोसेसर उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, फोनची रॅम, स्टोरेज आणि इतर हार्डवेअरची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे अंतिम परफॉर्मन्सबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट चित्र समोर येईल.
50MP चे तीन कॅमेरे?
Motorola Edge 70 Neo च्या कॅमेरा सेटअपकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. लीकनुसार, फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा Sony Lytia 710 मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो. यासोबत 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 3X ऑप्टिकल झूम सपोर्टसह 10 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असण्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कॅमेरा हा या स्मार्टफोनच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक ठरू शकतो.
5000mAh बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंग
बॅटरीच्या बाबतीतही फोनमध्ये चांगले फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यात 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 68W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. याशिवाय 15W वायरलेस चार्जिंगचा सपोर्टही मिळण्याची शक्यता आहे. फोनला पाणी आणि धुळीपासून संरक्षण देण्यासाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळू शकते, अशीही चर्चा आहे.
एकूणच, कॉम्पॅक्ट डिझाइन, OLED डिस्प्ले, 50MP कॅमेरे, दमदार प्रोसेसर, फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग यामुळे Motorola Edge 70 Neo मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये चांगली स्पर्धा निर्माण करू शकतो. मात्र, या सर्व फीचर्सची आणि किंमतीची अधिकृत पुष्टी मोटोरोला कंपनीकडून झाल्यानंतरच फोनची खरी वैशिष्ट्ये स्पष्ट होतील.





