Pandharpur – पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात खासदार धनंजय महाडिक यांच्यावरील सोशल मीडिया कमेंट्स आणि राजकीय वैमनस्यातून दोन गटांत भीषण हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात डोळ्यात मारण्याचा स्प्रे, फायटर आणि घातक हत्यारांचा वापर करण्यात आला. या रक्तरंजित संघर्षात खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक व भीमा कारखान्याचे संचालक तात्या मामा नागटिळक यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले. (Pandharpur) हल्ल्यात मामा नागटिळक यांचे बंधू धनाजी नागटिळक, जावई युवराज चव्हाण, समर्थक रामदास चव्हाण आणि मुलगा आकाश नागटिळक हे गंभीर जखमी झाले. क्राईम न्यूज (संग्रहित छायाचित्र) आकाश यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जुने राजकीय वैमनस्य आणि सोशल मीडियावरील वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. (Pandharpur) घटनेनंतर सुस्ते गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पंढरपूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस सध्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.