दिल्लीची कमान महिलेच्या हाती; कोण आहेत रेखा गुप्ता? नगरसेवक, विधानसभेला दोन वेळा पराभव अन् थेट मुख्यमंत्री….

Delhi CM | दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीतील भाजप आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे आता दिल्लीची कमान महिला सांभाळणार आहे. तर प्रवेश शर्मा यांचं नाव उपमुखमंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे. बुधवारी संध्याकाळी ही नावे जाहीर करण्यात आली आहे.
रेखा गुप्ता सध्या केंद्रशासित प्रदेश दिल्लीच्या शालिमार बाग असेंब्ली सीटच्या आमदार आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2025 मध्ये रेखा गुप्ता यांनी शलिमार बाग विधानसभा जागेवरून 29,595 मतांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांना पराभूत केले.
कोण आहेत रेखा गुप्ता ?
रेखा गुप्ता यांचा जन्म 1974 मध्ये हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील नंदगड गावात झाला होता. रेखा गुप्ता यांचे कुटुंब 1976 मध्ये दिल्लीत शिफ्ट झाले. त्यांच्या पतीचे नाव मनीष गुप्ता आहे. रेखा गुप्ता यांनी एलएलबी केले आहे. Delhi CM |
रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास
रेखा गुप्ता ह्या संघविचारक असून विद्यार्थी संघटनेपासून त्या भाजप पक्षात कार्यरत आहेत. 1994-95 ला दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या 1996-97 या काळात दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (डीयूएसयू) च्या अध्यक्षही होत्या. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला, 2007 मध्ये उत्तर पीतमपुरा (वॉर्ड) 54) येथून त्यांनी नगरसेवक निवडणूक जिंकली आणि 2012 मध्ये पुन्हा विजय मिळवला. मार्च, 2010 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
दोन वेळा पराभव
भारतीय जनता पक्षाने 2015 आणि 2020 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील शालिमार बाग विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांना तिकीट दिले होते. त्यावेळी वंदना कुमारी यांनी दोन्ही निवडणुकीत रेखा गुप्ता यांना पराभूत केले. मात्र 2025 च्या निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी अखेर आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव केला आणि आता त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
रामलीला मैदानात शपथ शपथविधी सोहळा
दिल्लीत भाजपला 27 वर्षांनी मोठा विजय प्राप्त झाला आहे. 8 फेब्रवारी रोजी भाजपला 70 जागांपैकी 48 जागा मिळाल्या. त्यानंतर 11 दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा केली. रेखा गुप्ता आणि प्रवेश वर्मा बुधवारी 12:30 वाजता रामलीला मैदानात शपथ घेतील. यावेळी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे.
हेही वाचा:
Pune : जीबीएसमुळे आणखी दोघांचा मृत्यू; मृतांची संख्या अकरावर





