पेठ (प्रतिनिधी) – पेठ ता.आंबेगाव येथील पहिला करोना रुग्णावर उपचार केल्यानंतर निगेटिव्ह झाल्याने त्याला आज (दि. 7) घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पेठ येथील 5 करोना रुग्णां पैकी आज सोडण्यात आलेल्या पहिल्या रुग्णाच्या पत्नीला सायंकाळी सोडणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई इथून आलेल्या 4 पॉझिटिव्ह रुग्ण अद्याप पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
पेठ येथील पाहिले दाम्पत्य करोना ग्रस्त झाले. तेव्हापासून पेठ गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. पहिला पॉझिटिव्ह रुग्ण बरा होऊन आल्याने पेठ ग्रामस्थांच्या मनातील भीती काहीशी कमी झाली आहे. सदर रुग्णाच्या पत्नीला सुद्धा आज रुग्णालयातुन घरी सायंकाळी सोडले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पेठ येथील लॉकडाऊन हे दि 12 पर्यंत आहे.