Comedian Death : आपल्या अफाट विनोदी शैलीने आणि अचूक टायमिंगने जगभरातील प्रेक्षकांना हसवणारे प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राज शर्मा (Comedian Death) यांचे २४ एप्रिल २०२६ रोजी दुःखद निधन झाले. वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने मनोरंजन आणि विशेषतः कॉमेडी विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राज शर्मा गेल्या काही महिन्यांपासून आजारपणाशी झुंज देत होते आणि शुक्रवारी त्यांची ही झुंज संपली. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, त्यांच्या जाण्याने (Comedian Death) चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राज शर्मा यांनी प्रामुख्याने अमेरिकेतील स्टँड-अप कॉमेडी सर्किटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या विनोदाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील सूक्ष्म निरीक्षणे आणि दैनंदिन जीवनातील हलकेफुलके अनुभव यांचा ते अत्यंत प्रभावीपणे वापर करत असत. याच खुसखुशीत शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले एक हक्काचे स्थान निर्माण केले होते. Comedian Death त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात असून, अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास याने राज शर्मा (Comedian Death) यांच्या आठवणीत अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. वीर दासने त्यांना श्रद्धांजली वाहिताना म्हटले की, “तू एक खूप मोठ्या मनाचा आणि उत्तम मित्र होतास. एक विनोदवीर म्हणून तुला ‘कॉमेडी विश्वातील सर्वोच्च सन्मानासह’ मी निरोप देत आहे. तुझे सादरीकरण इतके प्रभावी असायचे की तुझ्या नंतर रंगमंचावर जाऊन परफॉर्म करणे हे कोणासाठीही जवळपास अशक्यच असायचे. भावा, तुझ्या आत्म्यास शांती लाभो.” राज शर्मा यांच्या जाण्याने एका प्रतिभावान कलाकाराला कलाविश्व मुकले आहे.