Actress Priya Berde : ९० च्या दशकात अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याच काळत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी स्क्रिन शेअर केली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. यानंतर दोघांनी मिळून अनेक सिनेमांत एकत्र काम केले. पुढे दोघांचे सूत जुळले अन् त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेते लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर अभिनेत्री प्रिया बेर्डें यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या दुःखत प्रसंगातून त्यांनी स्वतः सावरत पुन्हा एकदा सिनेमा इंडस्ट्रीत काम करण्यास सुरूवात केली. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या जत्रा या सिनेमाने त्यांना पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आणले. आता तब्बल १० वर्षांनंतर अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील काजळमाया या मालिकेतून कनकदत्ता या महत्वाच्या भूमिकेतून प्रिया बेर्डे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडीओत अंगावर काटा आणणाऱ्या लुकमध्ये प्रिया बेर्डे दिसत आहेत. या मालिकेत पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. काजळमाया ही नवी गूढ मालिका येत्या 27 ऑक्टोबरपासून रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. View this post on Instagram A post shared by Ultra_Marathi Buzz (@ultra_marathibuzz) पर्णिकाच्या आई कनकदत्ता सुडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी आणि मोठे डोळे आणि आपल्या चेटकीण मुलीबद्दल अभिमान बाळगणारी आहे. आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकीण वंश पुढे वाढवावा अशी इच्छा कनकदत्ता बाळगून आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी ती कोणत्याही थाराला जाऊ शकते. या मालिकेतून कनकदत्ता आणि पर्णिकाच्या संघर्षमय आणि उत्कंठावर्धक प्रवासावर प्रकाश टाकला जाणार आहे. “ही भूमिका माझ्या आतापर्यंतच्या प्रवासातील वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका असल्याची प्रतिक्रिया प्रिया बेर्डेंनी दिली आहे. ‘काजळमाया’ मालिकेतून प्रेक्षकांना गूढ, थरार आणि भावनिक वळण अनुभवायला मिळणार आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा हा कमबॅक केवळ चाहत्यांसाठीच नाही तर मराठी मालिकांमध्ये गूढ आणि थरारक भूमिका साकारण्याची एक नवीन उदाहरण ठरणार आहे. हेही वाचा : Big Breaking! प्रशांत किशोर यांची निवडणुकीतून माघार ; म्हणाले,”मी निवडणूक लढवणार नाही, पण..” https