Colombia On US। व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर लॅटिन अमेरिकेत तणाव वाढत चालला आहे. यावेळी अमेरिकेचे लक्ष्य कोलंबिया असू शकते अशा चर्चा सुरु आहेत. दरम्यान, कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी स्वतः हा दावा केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुलं आव्हान दिलं आहे. त्यांनी “जर तुमच्यात हिंमत असेल तर या, मी इथेच वाट पाहत आहे.” असे म्हणत थेट इशाराच दिला आहे. व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या निवेदनात,” कोलंबिया अमेरिकेला कोकेन पुरवणाऱ्या आजारी नेत्याकडून चालवला जात आहे.”असे म्हटले आहे. एवढे नाही तर ट्रम्प यांनी असेही सुचवले आहे की कोलंबियाविरुद्ध लष्करी कारवाई करणे ही चांगली कल्पना असू शकते. या विधानामुळे कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये राजकीय गोंधळ निर्माण झाला. हल्ला झाला तर संघर्ष होईल – पेट्रो Colombia On US। ट्रम्प यांच्या या निवेदनाला उत्तर देताना कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो म्हणाले, “जर अमेरिकेने हल्ला केला तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल.” असा इशारा दिला. अमेरिकेचा हल्ला देशाला शस्त्रे उचलण्यास भाग पाडू शकतो आणि मोठ्या प्रमाणात गनिमी संघर्ष सुरू करू शकतो. असेही त्यांनी म्हटले आहे. पेट्रो यांनी, जर एखाद्या लोकप्रिय राष्ट्रपतीला अटक करण्याचा प्रयत्न केला गेला तर जनतेचा रोष उसळेल” असे त्यांनी म्हटले. शस्त्रे सोडणाऱ्या पेट्रो यांचे एक मोठे विधान स्वतः एकेकाळी डाव्या विचारसरणीचा गनिमी नेता असलेल्या पेट्रोने म्हटले आहे की, त्यांनी दशकांपूर्वी शस्त्रे सोडण्याची शपथ घेतली होती, परंतु जर देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला तर ते पुन्हा लढण्यास तयार असतील. या विधानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.. कोलंबियन सरकारने संतुलित दृष्टिकोन स्वीकारला Colombia On US। मात्र, राष्ट्रपतींच्या तीक्ष्ण विधानानंतर, कोलंबियन परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाने स्पष्ट केले की कोलंबिया संवाद आणि परस्पर आदरावर आधारित आंतरराष्ट्रीय संबंध शोधतो आणि कोणत्याही प्रकारची धमकी किंवा बळाचा वापर स्वीकारत नाही. अमेरिका-कोलंबिया संबंधांमध्ये तणाव ट्रम्प आणि पेट्रो यांच्यात संघर्ष होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली पेट्रो आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांवर निर्बंध लादले. कोलंबिया हा जगातील सर्वात मोठा कोकेन उत्पादन देश मानला जातो, ज्यामुळे अमेरिका बराच काळापासून नाराज आहे. व्हेनेझुएलानंतर पुढचे लक्ष्य कोण ? काही महिन्यांपूर्वी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनीही ट्रम्प यांना उघडपणे आव्हान दिले होते. यानंतर, अमेरिकेने मोठी कारवाई सुरू केली आणि मादुरोला अटक केली. आता, पेट्रो आव्हानाकडे या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे, ज्यामुळे अमेरिका-लॅटिन अमेरिकन संबंध आणखी ताणले जाऊ शकतात अशी भीती निर्माण झाली आहे.