बिकानेर – बिकानेरपासून 30 किमी अंतरावर असलेल्या देशनोक पोलीस स्टेशन परिसरात आज मंगळवार सकाळी भीषण अपघात झाला. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 25-26 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही धडक एवढी भीषण होती की बस व ट्रकचा चुराडा झाला.
देशनोक येथे बांधण्यात आलेल्या नवीन पुलावर हा अपघात झाला असून हा पुल आजच जनतेसाठी खुला करण्यात आला होता. भरधाव वेगात पुलावरून बस खाली येत असताना ट्रकला धडकली. या धडकेत बस आणि ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. गंभीर जखमींना लोकांनी आपल्या खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली व बचाव कार्यास सुरुवात केली.