तळेगाव ढमढेरे -करोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपण्याचा लौकिक राखत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सरकारच्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करून तब्बल 1 हजार 600 रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे.
लॉकडाऊन असताना जिल्ह्यातील विविध ठिकाणी तसेच ससून सर्वोपचार रुग्णालय, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, रुबी हॉल व सह्याद्री हॉस्पिटल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्त तुटवडा यामुळे भरून निघाला आहे.