Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP चा नवा प्लॅन ; उत्तर प्रदेशकडे वळवला मोर्चा
Cockroach Janta Party: नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर, कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) उत्तर प्रदेशात एक मोहीम सुरू केली आहे.

Cockroach Janta Party: नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर, कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) उत्तर प्रदेशात एक मोहीम सुरू केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने रामपूरमधील जौहर विद्यापीठ पाडण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात बोलताना,”हे देशासाठी अयोग्य ठरेल” असे सीजेपीने म्हटले आहे.
कॉकरोच जनता पार्टीनेसोशल मीडियावर, “वृत्तानुसार, देशभरात दररोज २० हून अधिक शाळा बंद होत आहेत. उत्तर प्रदेशातील विद्यापीठ पाडणे हा शिक्षण चिरडण्याचा निर्णय असेल, जो देशासाठी पूर्णपणे अस्वीकार्य असेल.” असे म्हटले आहे.
सीजेपीने म्हटले आहे की उत्तर प्रदेश सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि आदेश मागे घ्यावा.
रामपूर प्रशासनाकडून इमारती बेकायदेशीर घोषित Cockroach Janta Party:
रामपूर विकास प्राधिकरणाने विद्यापीठाच्या आवारातील ४० पैकी ३८ इमारती बेकायदेशीर घोषित केल्या आहेत. या इमारती बेकायदेशीर मानून, त्यांच्यावर बुलडोझर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.
रामपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, संस्थेला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर त्यांनी बेकायदेशीर बांधकाम हटवले नाही, तर रामपूर विकास प्राधिकरण स्वतःहून पाडकामाची कारवाई सुरू करेल. समाजवादी पक्ष रामपूर प्रशासनाच्या या कारवाईचा निषेध करत आहे.
सीजेपीचे जंतर मंतरवर आंदोलन Cockroach Janta Party:
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) नीट पेपरफुटीसाठी जबाबदारी निश्चित करण्याची आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करत जंतर मंतरवर आंदोलन केले.
या आंदोलनाचे प्रमुख नेते सोनम वांगचुक होते, परंतु आयोजक सीजेपीचे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजीत दीपके होते. सरकारने या आंदोलनाच्या मागण्या मान्य केल्या असून, धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.






