Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे निम्मे फॉलोअर्स पाकिस्तानमधील; ‘या’ भाजप नेत्याचा आरोप
सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (Cockroach Janata Party) या उपरोधिक डिजिटल ग्रुपचे जवळपास निम्मे फॉलोअर्स पाकिस्तानातील असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते सुकांत मुजुमदार यांनी शनिवारी केला.

Cockroach Janata Party : सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (Cockroach Janata Party) या उपरोधिक डिजिटल ग्रुपचे जवळपास निम्मे फॉलोअर्स पाकिस्तानातील असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते सुकांत मुजुमदार यांनी शनिवारी केला.
मुजुमदार म्हणाले, आता कॉकरोच जनता पार्टीचे (Cockroach Janata Party) इन्स्टाग्राम अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या ग्रुपचे सोशल मीडियावरील ४९ टक्के फॉलोअर्स हे पाकिस्तानमधील आहेत, तर केवळ ९ टक्के फॉलोअर्स भारतातले आहेत.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वकिलांच्या एका सुनावणीदरम्यान तरूणांसाठी कथितपणे कॉकरोच आणि परजीवी (Cockroach Janata Party) असे शब्द वापरले होते, ज्यावरून वाद निर्माण झाला होता.






