Coal India | कोल इंडियाचे कर्मचारी संप करणार
Updated On:

Coal India | कोल इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या कोळसा उत्पादक कंपनीतील कर्मचार्यांनी 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा संप करण्याचे जाहीर केले आहे.
कोल इंडिया कंपनी बरोबरच या कंपनीच्या इतर उप कंपन्यातील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. कोल इंडिया आणि तिच्या उप कंपन्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 80 टक्के एवढे कोळसा उत्पादन करतात.
त्यामुळे या घडामोडीचा कोळसा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोल इंडियाच्या व्यवस्थापनाने शेअर बाजाराला या संदर्भात माहिती दिली आहे. या कर्मचार्यांनी संपाची घोषणा केली आहे. मात्र संप कशासाठी केला जात आहे याची माहिती व्यवस्थापनाला दिलेली नाही.





