कोळसा–वीज घसरली, गुंतवणूक कमी… उद्योगक्षेत्र अडचणीत?

नवी दिल्ली – ऑक्टोबर महिन्यात पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता 3.3% या पातळीवर स्थिर आहे. सप्टेंबर महिन्यात ही उत्पादकता 3.3% होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही उत्पादकता 3.8 टक्क्यांनी वाढली होती. म्हणजे वार्षिक आणि मासिक पातळीवर या उत्पादकतेत फारसा बदल झालेला नाही.
ऑक्टोबर महिन्यामध्ये खते, पोलाद व तेल शुद्धीकरण क्षेत्राची उत्पादकता स्थिर राहिली. तर कोळसा आणि वीज उत्पादन काही प्रमाणात कमी झाले आहे. एकूण औद्योगिक उत्पादनात पायाभूत सुविधा क्षेत्राचा वाटा 40% असतो.
त्यामुळे औद्योगिक उत्पादनही ऑक्टोबर महिन्यात वाढण्याची शक्यता कमी असल्याचे समजले जात आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक वित्तीय तूट कमी करण्यासाठी कमी केली आहे. त्याचबरोबर खासगी क्षेत्र या क्षेत्रात पुढाकार घेत नाही. मात्र जीएसटी दर कपातीमुळे उत्पादन वाढवून खासगी क्षेत्र या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.





