Devendra Fadnavis meets Amit Shah : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यासह भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. त्यानंतर ते पहाटेच दिल्लीतून मुंबईत परतले असल्याची माहितीही समोर आली आहे. या भेटीदरम्यान, दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनिकरणावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. Ajit Pawar राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनिकरणावर बैठका झाल्याचा दावा अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनिकरणाच्या चर्चांनी वेग धरला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांच्यामध्ये विलीनिकरणावर बैठका झाल्याचा दावा केला जात असून आता देवेंद्र फडणवीसही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. यातच फडणविसांचा तातडीचा दिल्ली दौरा यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. Devendra Fadnavis meets Amit Shah Khed Election Results : खेडमध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग! शिवसेना (उबाठा)चे निर्विवाद वर्चस्व; भाजप-शिंदेंची अवस्था काय? सुनेत्रा पवार देखील लवकरच दिल्ली दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी जात असल्याची उपमुख्यमंत्री कार्यालयाची माहिती आहे. दिल्ली दौऱ्यामधे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल देखील सोबत असणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनिकरणाबाबत पुढील काही दिवसांत मोठी घडामोड घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Devendra Fadnavis meets Amit Shah हेही वाचा: Pune Election Results : मुळशीत ‘घड्याळा’चा गजर! राष्ट्रवादीचे वर्चस्व, पण भाजपचा ‘हा’ मोठा विजय; वाचा सविस्तर निकाल