Devendra Fadnavis : राज्यातील काही भागांमध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र समोर येत आहे.

विशेषतः ग्रामीण भागात डिझेलची कमतरता अधिक जाणवत असून, शेतीची कामं सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेलची साठेबाजी न करण्याचं आवाहन केलं आहे.

अफवांमुळे अनेकजण वाहनांच्या टाक्या फुल करण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करत असल्याने इंधनाचा तुटवडा अधिक वाढत असल्याचं दिसत आहे.

फडणवीसांनी दिल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना (Devendra Fadnavis)

या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, “सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः डिझेल शेतीसाठी आवश्यक असल्याने त्याचा योग्य पुरवठा होणं गरजेचं आहे. कुठेही साठेबाजी होऊ देऊ नका, असं स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Devendra Fadnavis : CM फडणवीस अॅक्शन मोडवर! पेट्रोल-डिझेलबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिले महत्वाचे आदेश

काही ठिकाणी तणावाची स्थिती असली तरी संपूर्ण राज्यात अशी परिस्थिती नाही. एखादी-दुसरी घटना मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते. मात्र सर्वत्र इंधन टंचाई आहे, असं चित्र नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीसांनी व्यक्त केली भीती

स्टेट अॅाफ हॉर्मुजमध्ये जलवाहतूक अजून सुरळीत झालेली नाही. इराणने समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सोपवण्याची अट मान्य केली नाही, तर अमेरिकेकडून पुन्हा युद्धाची घोषणा होऊ शकते. तशी सध्या स्थिती दिसत आहे. कारण इराण अमेरिकेच्या अटी मान्य करायला तयार नाहीय. पुन्हा युद्ध सुरु झालं, तर ऊर्जा संकट अजून गंभीर होऊ शकतं, अशी भीतीही मुख्यमंंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

कॅनचे दर वाढले

मागील आठ दिवसांपासून शेतकरी ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल हे कॅनमध्ये घेऊन जात असल्यामुळे आता त्याचं कॅनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी कॅनचा तुटवडा निर्माण झाला असून कॅनचे दर सुद्धा वाढले आहेत.

हेही वाचा :Chia Seeds: रोज चिया सीड्स खाताय? फायदे जितके मोठे, तितकेच नुकसानही जाणून घ्या