Sanjay Raut : अखेर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बहुप्रतिक्षित संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग समोर आला आहे. सकाळपासूनच या मुलाखतीची जोरदार चर्चा असून, दैनिक ‘सामना’ला ही मुलाखत देण्यात आली आहे. या मुलाखतीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विविध गोष्टींवर ठाकरे बंधूंनी प्ररखड शब्दांत भाष्य केले आहे. ही स्फोटक मुलाखत उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि सिनेदिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. अशातच आज सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंशिवाय मुंबईत दुसरा ब्रँड नाही आणि या निवडणुकीत ब्रँड सांगणाऱ्यांचा ब्रँड वाजवू, असे ते म्हणाले होते. यावर राऊतांनी फडणवीसांना जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी ब्रँडची ब्रँडी प्यायली आहे थोडशी. ती शाकाहारी बँडी आहे गुजरातची. त्यामुळे त्यांना ती चढणार नाही, असे राऊत म्हणाले. तसेच तुम्ही कोण ठरवणारे असा सवाल फडणवीसांना राऊतांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरही आम्ही निवडणूका लढलो असून जिंकलो देखील असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत म्हणाले… पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले असून, महापालिका निवडणुकीनंतर ते एकत्रच राहितील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. यावर संजय राऊत यांनी एकाच वाक्यात उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार एनडीएसोबत जाणार नसल्याचे राऊत म्हणाले आहेत. मला तसं वाटतं नाही. शरद पवार यांनी शाहू, फूले आणि आंबेडकर विचारधारा सोडून ते जाणार नाहीत. माझं वारंवार त्यांच्याशी या विषयावर चर्चा होत असते, असे देखील राऊतांनी स्पष्ट शब्दांता सांगितले. हेही वाचा : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्र माधव गाडगीळ यांचे निधन; निसर्गसंवर्धनासाठी लढणारा आवाज हरपला