CM Devendra Fadnavis live : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा… पाहा VIDEO

CM Devendra Fadnavis live :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांची विधानसभेत उपस्थिती आहे.

Updated On:

CM Devendra Fadnavis live : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा या वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी विधानसभेत सादर करत आहेत. राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे पहिलेच मुख्यमंत्री हा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर या निमित्ताने जमा होणार आहे. CM Devendra Fadnavis live

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी यासंदर्भात कोणती घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी काळात राज्यात मोठ्या निवडणुका नसल्यानं लोकप्रिय घोषणांचा समावेश राज्याच्या अर्थसंकल्पात असतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकासाकडे जाणारा आहे. महात्मा फुले यांच्या जन्माला २०० वर्ष पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल.  CM Devendra Fadnavis live

बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील तसेच सामाजीक समरसता वर्ष म्हणुन साजरा केला जाईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच काम पुर्ण झालं आहे काही योजना सुरु केल्या जातील.

तसेच राज्यात १ हजार २०० किमीचे मेट्रो मार्ग व ६ हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील. २०१९ पर्यंत १६५ किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी २०२८ पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत. वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पनवेल ते कर्जत अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचं सांगण्यात आलं.

Maharashtra Budget 2026

Maharashtra Budget 2026

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राचं प्रतिबिंब असून देशाचं अर्थिक इंजिन, आपला वाटा मोठा असेल. प्रत्येक अर्थसंकल्पात त्याची छबी दिसेल असं देखील म्हणाले. राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणार आहे. त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला होता. दुर्दैवी अपघाताच्या घटनेमुळे आता अर्थ खात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री हा अर्थसंकल्प सादर करताना दिसत आहेत. तरी गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला जी दिशा दिली होती ती कायम ठेवण्याचे आव्हान या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांची विधानसभेत उपस्थिती आहे.

आणखी संबंधित बातम्या

Top 10 News : महिनाभरापासून CSC सेंटर बंद ते पुढील वर्षीच्या पावसावरही एल निनोचं सावट..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

2026-09-27 18:01:58

Top 10 News : महिनाभरापासून CSC सेंटर बंद ते पुढील वर्षीच्या पावसावरही एल निनोचं सावट..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Newasa News : नेवासे तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण! थेट मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी नितीन दिनकर यांना मिळाला बाप्पाच्या आरतीचा बहुमान

2026-09-27 15:46:02

Newasa News : नेवासे तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण! थेट मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी नितीन दिनकर यांना मिळाला बाप्पाच्या आरतीचा बहुमान

Maharashtra drought : महाराष्ट्रात दुष्काळ कधी जाहीर करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली 'ही' तारीख

2026-09-22 17:18:54

Maharashtra drought : महाराष्ट्रात दुष्काळ कधी जाहीर करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली 'ही' तारीख

Maharashtra Politics : माजी आमदाराचा काँग्रेसला 'जय महाराष्ट्र'! भाजपमध्ये पक्षप्रवेशाची तारीखही ठरली...

2026-09-21 10:42:15

Maharashtra Politics : माजी आमदाराचा काँग्रेसला 'जय महाराष्ट्र'! भाजपमध्ये पक्षप्रवेशाची तारीखही ठरली...

Political News : काँग्रेसला मोठा धक्का बसणार ! 'हा' बडा नेता सोडणार पक्षाची साथ

2026-09-20 21:04:59

Political News : काँग्रेसला मोठा धक्का बसणार ! 'हा' बडा नेता सोडणार पक्षाची साथ