CM Arvind Kejriwal । केंद्रीय अन्वेषण ब्युरोने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतरांविरुद्ध मद्य धोरण प्रकरणी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च 2024 रोजी ED ने कथित मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंगच्या चौकशीत अटक केली होती. यानंतर २६ जून रोजी सीबीआयने केजरीवाल यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली. सीबीआय आणि ईडीने आता अबकारी घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांच्याविरोधातील तपास पूर्ण केला आहे. गेल्या सुनावणीत सीबीआयने न्यायालयाला सांगितले होते की, लाच घेतल्यानंतर दिल्लीच्या अबकारी धोरणाचा फायदा घेण्यासाठी त्यांच्या इच्छेनुसार बदल करण्यात आले होते. ईडी प्रकरणात जामीन मंजूर CM Arvind Kejriwal । केजरीवाल यांना यापूर्वीच ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे. मात्र, सीबीआयच्या अटकेप्रकरणी तो तिहारमध्ये दाखल आहे. याप्रकरणी त्यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. CBI कोर्टात काय म्हणाले? CM Arvind Kejriwal । सीबीआयने राऊस ॲव्हेन्यू कोर्टात गेल्या सुनावणीत , आमच्याकडे पैशांचा माग आहे. तसेच पुरेसे पुरावे आहेत. दक्षिण गटाच्या सांगण्यावरूनच दारू धोरणात बदल करण्यात आला असे सांगितले होते. सीबीआयच्या वकिलाने हायकोर्टात सांगितले होते की, “आम्ही अरविंद केजरीवाल यांना चौकशीदरम्यान विचारले की, खासगीकरण आणि अबकारी धोरणातील बदलाचा निर्णय कोणाचा होता, तेव्हा मंत्रिमंडळाचे प्रमुख केजरीवाल यांनी हा निर्णय माझा नाही,” असे सांगितले. माझा याच्याशी काहीही संबंध नाही, हे दुसऱ्याने केले आहे, हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसते आहे.” सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी दुसरीकडे, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सिसोदिया गेल्या 16 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. तपासाची गती कमी असल्याचे कारण देत त्यांनी जामिनाची मागणी केली आहे. हेही वाचा नेमबाजीत पुन्हा होणार कमाल; भारताला आणखी दोन पदकाची आशा; कसे असणार आजचे वेळापत्रक ?