पुण्यात ढगाळ वातावरण! या जिल्ह्यांमध्ये गारपीठ होण्याची शक्यता, पुढचे तीन दिवस….

Pune | गेल्या काही दिवसांत वातावरणात मोठा बदल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उकाडा वाढत असला तरी वातावरणात बदल होऊन ढगाळ स्वरुपाचे वातावरण दिसत आहे. मागील तीन दिवसांपासून अशा स्वरुपाचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यात काही ठिकाणी गारपीठ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुणे ,नाशिक, अहिल्यानगर जळगाव, सातारा या ठिकाणी गारपीठ होणार असल्याचा अंदाज वर्तवला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, एप्रिल, मे आणि जून महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त तापमान असणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता येणाऱ्या पाच दिवसांत राज्यात पावसाची शक्यता आहे.
सूर्य झाला गायब
मार्चच्या मध्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढला होता. अशरशा: चटके बसत होते. सूर्य तळपत होता. जीवाची काहीली होत होती. पुण्यातील तापमान चाळीशीला गेले होते. पण गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाला असून तळपणारा सूर्य गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.





