केदारनाथमध्ये ढगफुटी! 200 यात्रेकरू अडकले; बचाव कार्य सुरू

Kedarnath Cloudburst | उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये बुधवारी ढगफुटी झाली आहे. दगडी ढिगाऱ्यांमुळे सुमारे 30 मीटर चालण्याच्या मार्गाचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पादचारी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यात भीमबली येथे सुमारे 150 ते 200 यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम पाठवण्यात आल्या आहेत. पावसामुळे अनेक भागांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील अनेक भागात भूस्खलनमुळे रस्ते आणि पूल वाहून गेले आहे. केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर लिनचोलीजवळ ढगफुटीची घटना घडली. त्यामुळे काहीच क्षणात मंदाकिनी नदीची जलपातळी वाढली. यामुळे केदारनाथला जाणारी पदयात्रा विस्कळीत झाली आहे. उत्तराखंडच्या टिहरी, रुद्रप्रयाग आणि भिंबलीमध्ये ढगफुटीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी यात्रेकरू मोठ्या संख्येने अडकले आहेत. Kedarnath Cloudburst |
VIDEO | Cloudburst reported in Uttarakhand’s Kedarnath, several feared trapped. Details awaited.
(Source: Third Party) pic.twitter.com/dRlLi2vvls
— Press Trust of India (@PTI_News) July 31, 2024
मंदाकिनी नदीच्या पाण्याची पातळी वाढ
सध्या प्रशासनाने शाळा बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. हवामान खात्याने उत्तराखंडमधील सात जिल्ह्यांमध्ये ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. डेहराडून, टिहरी, पौरी, नैनिताल, हरिद्वार, उधम सिंह नगर आणि चंपावत जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
गौरीकुंड येथील मंदाकिनी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचलेत. मुसळधार पावसामुळे गढवाल आणि कुमाऊंमधील विविध भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी ढिगारा आणि दगड पडल्याने चारधाम यात्रा मार्ग ठप्प झाला आहे. Kedarnath Cloudburst |
हिमाचल प्रदेशातही मोठे नुकसान
मुसळधार पावसामुळे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातही मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हिमाचल प्रदेशातील शिमला येथील रामपूरजवळ ढगफुटीमुळे 20 हून अधिक लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा:
‘नव्या संसद भवनाच्या छतावरून पाणी गळती’ काँग्रेस खासदाराने व्हिडिओ केला शेअर





